अकोला : डोंबिवली येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. दरम्यान, सासू व सासऱ्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला. या प्रकरणात खदान पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला.

खडकी येथील भाग्यश्री कैलास वाघमारे (३३) यांच्या तक्रारीनुसार मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा येथील कैलास भीमराव वाघमारे (३६) याच्यासोबत २०१४ मध्ये लग्न झाले. लग्नामध्ये वडिलांनी ७५ ग्रॅमचे दागिने दिले. काही दिवस सासरी राहिल्यानंतर सासू मंदा वाघमारे हिने अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. पतीची नोकरी मुंबईला असल्याने डोंबिवली येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणण्यास नकार दिल्याने पती कैलास वाघमारे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी ‘तू मला आवडत नाहीस, तुझ्यासोबत संसार करायचा नाही, असे म्हणत घटस्फोटाची नोटीस पाठवली. घरातून मुलासह हाकलून दिले.

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसी आंदोलकांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात

हेही वाचा – यवमताळ : रेशनचा २८ टन तांदूळ जप्त; सण, उत्सवात सरकारी धान्याचा काळाबाजार उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली. भरोसा सेलमध्ये पती-पत्नीमध्ये समेट झाला नाही. अखेर खदान पोलिसांनी पती कैलास वाघमारे, सासू मंदा, सासरे भीमराव वाघमारे व जेठ श्रीकृष्ण वाघमारे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला.