यवतमाळ : शासन गोर गरीब जनतेसाठी सण-उत्सवाच्या काळात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करत आहे. दुसरीकडे या सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

तुळजापूर-नागपूर महामार्गावरील महागाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांदूळ घेवून जाणारा ट्रक संशयावरून पकडला होता. या ट्रकमधील धान्य रेशनचे असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ट्रकसह २८ टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील तिघाजणांविरुद्ध विविध कलमान्वये महागाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
Shikhar Bank Malpractice Case There has been no irregularity in the working of the bank
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही

हेही वाचा – गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त

नांदेड येथून २८ टन तांदूळ भरलेला ट्रक (एमएच-४० – सीडी – ०५७१) राष्ट्रीय महामार्गाने यवतमाळ मार्गे नागपूरकडे जात होता. अंबोडा येथील उड्डाण पुलाजवळ पथकाने ट्रक थांबवून त्यातील चालकाकडे कागदपत्रांची विचारणा केली. त्यावेळी ट्रक चालक शेख मुज्जमील शेख आलम (४५) रा. नवी आबादी नांदेड याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ट्रकची तपासणी केली असता पांढऱ्या व खाकी रंगाच्या पोत्यामध्ये तांदूळ आढळून आला. पथकाने तातडीने महागाव तहसीलच्या पुरवठा निरीक्षकांचा अभिप्राय प्राप्त केला. त्यांनी सदर ट्रकमधून जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत असलेल्या धान्याची अवैध वाहतूक होत असल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर ट्रक चालकास विचारपूस केली असता त्याने हा तांदूळ नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील शेख रफीक शेख मेहबूब याचा असल्याचे व ट्रक प्रिन्स ट्रान्सपोर्टचे मालक सय्यद इरफान (रा. नांदेड) याचा असल्याचे सांगितले. तिघेजण संगनमत करून सुमारे ११ लाख २० हजाराचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकसह २८ टन तांदूळ जप्त केला.

हेही वाचा – चंद्रपूर : ओबीसी आंदोलकांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात

तीनही आरोपींविरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुरवठा विभाग धान्य वितरणावर लक्ष ठेवून असल्याचे सांगत असताना लाखो रुपयांचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.