नागपूर : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने विदारक चित्र समोर आणले आहे. कशा प्रकारे देश पोखरला आहे. आमच्या बहिणींना दिशाभुल केले जात आहे. हे षडयंत्र असून ते समोर आले पाहिजे. हा सिनेमा बघितल्यानंतर अनेकांचे डोळे उघडले आहे. त्यामुळे मी हा चित्रपट पहायला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> अमरावती : “राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रव्यापी पक्षच नाही”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र अव्हाड जे बोलत आहे ते अतिशय चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करण्यासाठी ते या कसरती करत आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत हिंदू समाजामध्ये रोष आहे. त्यांचे वक्तव्य तपासले जाईल आणि बेकायदेशीर असेल तर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. कर्नाटकमध्ये उद्या निवडणुका असून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकणार असल्याचे फडणवीस म्हणाले.