वर्धा : सोशल मीडिया आता मनोरंजन, माहिती, मालाची जाहिरात करणारे स्वस्त व सुलभ माध्यम म्हणून चांगलेच लोकप्रिय ठरू लागले आहे. त्याचा फायदाही होतो. मात्र हे माध्यम दुधारी तलवार ठरत असल्याचे फसवणुकीच्या अनेक घटनांतून दिसू लागले आहे. या माध्यमाच्या आधारे खरेदी विक्री करण्याचे प्रकार आहेत. या ठिकाणी मात्र वाहन विक्रीत गंडा घातला गेल्याचे दिसून आले.

येथील अनमोल नगरातील रहिवासी बोधेश्वर प्रसाद दुबे यांनी माध्यमावर कार विक्रीची जाहिरात पाहली. मग दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. सौदा पटला. ४ लाख ९० हजार रुपयांत खरेदी ठरली. कार मालक बदलणे, वित्त संस्था, अग्रिम व अन्य कामांसाठी पैशांची मागणी झाली. दुबे यांनी त्या अ‍ॅपच्या माध्यमातून २ लाख ७ हजार रुपये ऑनलाईन पाठविले. मात्र पैसे देवूनही कार मिळाली नाही. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तर उत्तर नाही, असा अनुभव आल्यावर दुबे यांना फसगत झाल्याचे लक्षात आले.

हेही वाचा – खुशखबर! तुमच्या वस्तीतील स्वस्त धान्य दुकानांमधून लवकरच बँक सेवाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी त्यांनी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस वारंवार अशा ऑनलाईन व्यवहारांवर लक्ष ठेवून नागरिकांना सावध करीत आहे. मात्र कमी किमतीत चांगले वाहन मिळण्याचा मोह नागरिकांना बळी पाडणारा ठरतो. चारचाकीच नव्हे तर दुचाकी विक्री खरेदी करण्याचा मोहही फसवणूक करणारा ठरत असल्याचे चित्र आहे.