उपराजधानीतील बऱ्याच औषध दुकानांमधून नियमबाह्यरित्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या सेवन केल्याने ५ टक्के महिलांमध्ये गुंतागुंत होते. त्यापैकी काही महिला अत्यवस्थही झाल्याचे निरीक्षण नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक ॲण्ड गायनॉकॉलाजिकल सोसायटीने (एनओजीएस) नोंदवले आहे.

हेही वाचा >>> धार्मिक स्थळासमोर घोषणाबाजीमुळे दोन गटात तणाव; हाणामारीत सात जखमी, ३८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

‘एनओजीएस’ संघटनेची २०२३-२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी घोषित झाली आहे. त्यानिमित्त नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गर्भपाताच्या औषधी कायद्यानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दुकानदारांना कुणालाही विकता येत नाही. परंतु, बरेच दुकानदार या नियमांना छेद देत आहे. त्यामुळेच औषध दुकानातून अनेकांना गर्भपाताच्या गोळ्या सहज मिळतात. यातून होणाऱ्या दुष्परिणामांची रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती नसते.

हेही वाचा >>> अमरावती: प्रेमवीर मुलीला म्हणाला, तू फक्‍त हो म्‍हण, दोघांसाठी रेल्‍वेचा डबा बुक केला आहे, पुढे झाले असे की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने सुमारे पाच ते सात टक्के महिलांमध्ये गुंतागुंत संभावते. तर काहींची प्रकृती अत्यवस्थही असल्याच्या वृत्ताला प्रसूतीरोग तज्ज्ञांनी दुजोरा दिला. काही दिवसांपूर्वी एका दाखल करण्यात आलेल्या अत्यवस्थ महिलेने अशा प्रकारे औषध दुकानातून मिळणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले. तिला अतिरक्तस्राव झाला होता. तातडीने तिच्यावर उपचार झाल्याने तिचा जीव वाचला. इतरही अनेक महिलांसोबत असे प्रसंग घडतात. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय देण्यात येऊ नये, अशी मागणी स्त्री व प्रसूतीरोग संघटनेतर्फे लावून धरण्यात येणार असल्याचे, डॉ. सुषमा देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. संदीप निखाडे, डॉ. वर्षा ढवळे, डॉ. प्रगती खळतकर, डॉ. राजसी सेनगुप्ता, डॉ. अर्चना कोठारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.