बुलढाणा: महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी खळबळजनक मागणी ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच राज्यपालांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी पूरक मागणीही त्यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा – दिवाळीत वीज अपघात टाळायचेय? मग अशी काळजी घ्या…

हेही वाचा – नागपूर : “कुणबी समाजाने मोठं मन करून काय होणार”, तायवाडेंचा मिटकरींना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्तर-ऐंशीच्या दशकापासून आजपावेतो राजकारणात सक्रिय असलेले सुबोध सावजी हे मेहकारमधून दोनदा आमदार म्हणून काँग्रेसतर्फे निवडून आले. राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यापूर्वी युवक काँग्रेस व संघटनमध्ये त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. दीर्घकाळ राजकारणात कार्यरत या नेत्याने सध्याची कायदा सुव्यवस्थाची स्थिती, महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून निच्चांकी पातळीवर आहे. मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सर्वपक्षीय, सर्व जाती धर्माचे नागरिक, मराठा समाज नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. एकूण परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. मराठा युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शासन निष्क्रिय असून जनजीवन १०० टक्के विस्कळीत झाले आहे. भूतो ना भविष्यती असे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सावजी यांची मागणी आहे.