चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉटचे कालबाह्य झालेले १ व २ क्रमांकाचे संच पाडण्यात येऊन जागा मोकळी करण्यात आली. ही प्रक्रिया वीज केंद्राच्या वतीने बुधवारी पूर्ण करण्यात आली. वीज केंद्राच्या २१० मेगावॉटच्या या दोन संचातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने कालबाह्य झालेले हे दोन्ही संच पाच वर्षांपूर्वीच बंद करण्यात आले होते. हे दोन्ही संच बंद असेल तरी त्याच्या चिमणी तशाच उभ्या होत्या. त्यामुळे वीज केंद्राची बरीच जागा व्यापलेली होती. ही जागा मोकळी करण्यासाठी म्हणून आज बुधवारी या दोन्ही संचाच्या चिमण्या पाडण्यात आल्या. त्यामुळे बरीच जागा मोकळी झाली आहे. दोन्ही चिमण्या पाडण्यात आल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी दिली.