अमरावती : जन्मदात्या वडिलाने मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्‍याची संतापजनक घटना मंगळवारी मोर्शी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

२९ एप्रिल रोजी सायंकाळी पीडित १३ वर्षीय मुलीची आई ही स्वयंपाकासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी ही घरी एकटी होती. त्यावेळी घरी आलेल्या वडिलाने तिच्याकडे अश्लाघ्य मागणी केली. मात्र, तिने मी तुमची मुलगी असल्याचे सांगून त्यास नकार दिला. त्यावर वडिलाने तिला चाकू भोसकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली. त्यानंतर वडिलाने घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुलगी रडायला लागली. त्यावर वडिलाने तिला मारण्याची धमकी दिली. यापूर्वीसुद्धा वडिलाने अत्याचार केल्याने पीडित मुलीने धाडस दाखवत आपल्या एका नातेवाइक महिलेकडे ही बाब सांगितली. हा धक्कादायक प्रकार कळल्यावर नातेवाइक महिलेने मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलाविरुद्ध बलात्कार, धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा >>>खिचडी कमी वाढल्‍याच्‍या कारणावरून पतीने केली पत्‍नीची हत्‍या; चिखलदरा तालुक्‍यातील धक्कादायक घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्‍य एका घटनेत समाज माध्‍यमावर ओळख झालेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. ऐनवेळी तिला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना मंगळवारी दत्तापूर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश बबन यादव (२७) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित २८ वर्षीय तरुणीची समाज माध्यमावरून आकाशसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर त्या दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. या काळात आकाशने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, काही दिवसांनी आकाशने पीडित तरुणीशी मोबाइलवर संपर्क साधून मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, माझे दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळले आहे, असे सांगितले. या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडित तरुणीने दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आकाशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.