भंडारा : मनात संशयाने घर केले की संसार आणि नाती या सर्वांचीच माती होते. अशीच एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. त्या जोडप्याचा सुखी संसार सुरू होता. मात्र कालांतराने दोघांमध्ये खटके उडू लागले.

पत्नीचे आपल्याच जिवलग मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावला आणि एके दिवशी नवऱ्याने मित्रालाच संपवून टाकले. मित्राचा चाकू भोसकून खून केला. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात घडली. अंकुश साठवणे (वय ३८) असं मृतकाचे नाव आहे. मृतक हा देव्हाडी ग्रामपंचायतचा सदस्य होता. तर, मुन्ना बिरणवार (वय ३२) असं आरोपीचे नाव असून त्याला तुमसर पोलीसांनी चाकूसह ताब्यात घेतलं आहे.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. हत्या, बलात्कार, तरुणींवर अत्याचार या प्रकारच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. त्याचदरम्यान, भंडारामध्ये एक धक्कादायक तसेच भयंकर घटना उघडकीस आली आहे. आपल्याच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचे मृतक मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले. दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झालं होतं. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृताच्या घरी एकत्र आलेत. मात्र, आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकुश साठवणे यांच्यावर चाकुने हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षी धावून आली. यात ती ही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहे. दरम्यान, आरोपीला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.