बुलढाणा : दुर्लक्ष वा उपचारात हयगय केल्यास अंतिम स्थितीत धोकादायक ठरु शकणाऱ्या डेंग्यूचा जिल्ह्यातील ८ तालुक्यात प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आहे. सध्यस्थितीत या रोगाचे तब्बल ४५ रुग्ण आढळून आले आहे. मेहकर येथील एका युवतीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा दावा निकटवर्तीय करीत असले तरी आरोग्य विभागाने मात्र तो तूर्तास फेटाळून लावला आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागात प्रसार झालेल्या या रोगाने चार शहरातही हातपाय पसरले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील घाटावरील ५ तालुक्यात डेंग्यूचा जास्त प्रादुर्भाव असून तुलनेने घाटाखाली सध्यातरी याचा प्रकोप कमी आहे. घाटावरील चिखली तालुक्यात डेंग्यूचा प्रकोप जास्त असून चिखली शहरात ३ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळून आले आहे. बुलढाणा तालुक्यात २, लोणारात ४, मेहकरात एक, सिंदखेडराजात ३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका

हेही वाचा : यवतमाळ : साडेसहा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त; दोघांना अटक

घाटाखालील खामगावमध्ये जास्त कहर असून शहरात १ तर तालुक्यात ५ रुग्ण आहे. नांदुरा व मोताळ्यात प्रत्येकी ४ तर जळगाव जामोदमध्ये २ रुग्ण निष्पन्न झाले आहे. आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण संख्या तब्बल ४५ पर्यंत गेली आहे. चिखली, मेहकर, जामोद व खामगाव शहरातही रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे.

हेही वाचा : बुलढाणा: दोन एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर; हुमणी अळीमुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

‘त्या’ युवतीचा अहवाल मागविला

मेहकर येथील १७ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान संभाजीनगर येथे मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचा दावा निकटवर्तीय करीत आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्राने हा दावा तूर्तास फेटाळून लावला आहे. मृत युवतीचा अहवाल मागविला असून अहवाल प्राप्त झाल्यावरच नेमके मृत्यूचे कारण सांगता येईल असे सूत्राने स्पष्ट केले.

हेही वाचा : अमरावती : रक्‍कम परत मिळवून देण्‍याच्या नावावर ९४ हजारांनी गंडविले; ‘हे’ ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले अन्..

चिकन गुनियाचे ११ रूग्ण

डेंग्यू फोफावत असतानाच चिकून गुनियाने देखील डोके वर काढले आहे. आजअखेर जिल्ह्यात ११ रुग्ण आढळले आहे. याचाही चिखली तालुक्यात जास्त प्रकोप आहे. चिखलीमधील गजानन नगर, संभाजी नगर व हरिओम नगरात मिळून ४ तर भानखेड, करवंड गावात ३ रुग्ण आहेत. लोणार तालुक्यातील गुंजखेड, बुलढाण्यातील पांगरी आणि नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील हे रुग्ण आहे.