बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा देशी पिस्तूलसह मॅगझीन,काडतूस जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सोनाळा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. सोनाळा ( जिल्हा बुलढाणा) पोलीस हद्दीतील टूनकी बुद्रुक ते लाडणापूर मार्गावरील केदार नदी नजीक एका युवकास पोलिसांच्या पथकाने ६ देशी पिस्तूल, ७ मॅगझीन, १ जिवंत काडतूससह पकडले.

हेही वाचा : जावयाच्या डोळ्यात मिरपूड टाकून बॅटने बेदम मारहाण! सासुविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल; शेगाव तालुक्यातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोपी दूरवरच्या राज्यातील निघाला. वसीम खान इलियास खान ( वय २२, रा. सिंगार पुन्हाना, जिल्हा नूहू, हरियाणा) असे आरोपीचे नाव असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलांची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चंद्रकांत पाटील, कर्मचारी विनोद शिंबरे, राहुल पवार, शेख इम्रान यांनी ही कारवाई केली. दरम्यान आरोपी वसीम खान विरुद्ध शस्त्र अधिनियम सन १९५९ च्या कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर न्यायालयाने आरोपीस ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.