बुलढाणा : खामगाव तालुक्याला आज सायंकाळी झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. वझर, काळेगाव या महसूल मंडळामधील अनेक गावांमध्ये गारपीट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

शाळा, अंगणवाडी, घरांवरील टीनपत्रे उडाली. तसेच भाजीपाला, आंबासह इतरही पिकांचे नुकसान झाले. सायंकाळी पाच वाजता मौजे पाळोदी (ता. शेगाव) येथे वीज कोसळल्याने शिवाजी महादेव भेंडे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. यंत्रणा, नेते, पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत गुंतल्याने बाधित हजारो शेतकरी, ग्रामस्थांना कुणी वाली उरला नाही, असे दुर्देवी चित्र आहे.

हेही वाचा : नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर

संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री आडगाव येथे अवकाळी पावसादरम्यान विजेचा मोठा लोळ कोसळला. यामुळे ७ मेंढ्या तर २ बकऱ्या दगावल्या. यामुळे मेंढपाळांचे नुकसान झाले असून तत्काळ मदतीची मागणी त्यांनी केली आहे.