बुलढाणा : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ४१६ लाभार्थी शेतकरी वंचित आहे. या शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्तता न केल्याने त्यांच्या वर ही वेळ आल्याचे सांगितले जात आहे. किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र आणि शासनाकडून पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. यामुळे अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. मात्र, यासाठी लाभार्थ्यांनी ‘ई-केवायसी’ आणि आधार सीडींग’ करून घेणे बंधनकारक आहे. नेमके तेच न केल्याने २४ हजारांवर शेतकरी वंचित आहेत. जिल्ह्यातील १० हजार ६१९ शेतकऱ्यांनी ‘केवायसी’ तर १३ हजार ७९७ शेतकऱ्यांनी ‘आधार लिंकिंग’ केलेच नाही. योजनेचा १६ वा हप्ता जानेवारी, २०२४ च्या शेवटी वितरीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा : “मुंबईत मुली रात्री १२ वाजता…”, महिला सुरक्षेसंदर्भात फडणवीसांचं विधानसभेतील विधान चर्चेत!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबर, २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या मोहिमेतर्गत तरी ही पूर्तता करून घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना यासाठी तालुका कृषि कार्यालय, कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे.