बुलढाणा : राजस्थानमध्ये अल्प पाऊस पडतो, याशिवाय इतर संकटेही असतात. मात्र तरीही तेथील शेतकरी आत्महत्या करत नाही. याचे कारण ते शेती पूरक व्यवसाय करतात, पशुपालन, फळबाग दुग्धव्यवसाय करतात. सिंदखेडराजा येथे अभिता ऍग्रो व कृषी विभागाच्या वतीने आयोजित राज्य कृषी महोत्सवाचे उद्घाटन थाटात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करतांना राजस्थानमधील प्रगतिशील शेतकरी सुरेंद्र आवाना यांनी शेतकरी आत्महत्यांची कारणमीमांसा करताना त्यावर वरील उपाययोजना देखील सुचविली. यावेळी बियाणे उत्पादक सुखजितसिंग भंगू (पंजाब), प्रीतम सिंग (हरियाणा), प्रसिद्ध केळी उत्पादक धीरेंद्रकुमार देसाई (गुजरात), नारळ व सुपारी व्यावसायिक पांडुरंग पाटील (गोवा), मृद व जलसंधारण अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार मिश्रा(नवी दिल्ली), पोल्ट्री फार्म व्यावसायिक रवींद्र मेटकर (अमरावती), अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : आंभोरा ब्रिजवर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेटच्या ब्रिजची प्रतिकृती, पुलावरच ४० फूट उंचीवर ‘स्काय गॅलरी’; आज लोकार्पण

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

यावेळी आवाना पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकीकृत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे. जैविक शेतीमुळे पाण्याची बचत होते. जमिनीचे स्वास्थ चांगले राहते. परिणामी अधिक उत्पन्न मिळते. जैविक उत्पादने आरोग्यास लाभदायी असतात. येणारा काळ जैविक शेतीचा असून शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी प्रदर्शनाचे उदघाटन अभिता कंपनीचे ‘सीईओ’ सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके होत्या. यावेळी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके उपस्थित होते.

हेही वाचा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल दावा ठोकणार? म्हणाले, “आम्ही लढण्याचा निर्णय घेतला तर…”

सिंचन संस्कृतीशिवाय समृद्धी नाही

जलतज्ज्ञ सुधाकर चौधरी यांनी सिंचन संस्कृती निर्माण केल्याशिवाय आपल्या जीवनात समृद्धी येऊ शकत नाही, असे प्रतिपादन केले. हरियाणाचे प्रीतम सिंह यांनी सांगितले की, आपल्या उत्पादनांचे ‘मार्केटिंग’ स्वतःच करणे काळाची गरज आहे. मालाची विक्री करता येत असेल तरच उत्पादन घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. पंजाबचे भंगू यांनी अनुभव कथन केले. जयश्री शेळके यांनी बळीराजाची व्यथा मांडली. सरकारचे दुर्लक्ष आणि निसर्गाची अवकृपा अशा दुहेरी संकटात जगाचा पोशिंदा शेतकरी अडकला आहे. त्यामुळे सरकार व समाजाने त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.