चंद्रपूर : मोठ्या वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे (४७), त्यांचा मुलगा चेतन गोविंदा पोडे (१६ ) व भाचा गणेश रवींद्र उपरे (१७) या तिघांचा वर्धा-इरई नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी उघडकीस आली असून एकाचा मृतदेह मिळाला तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. नांदगाव (पोडे) येथील गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. आज त्यांच्या अस्थीविसर्जनासाठी संपूर्ण कुटुंबीय वर्धा-इराई नदीच्या संगमावर दुपारी १ वाजता गेले. पूजेनंतर अस्थी विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा : वाशीम : दुष्काळ जाहीर, सवलतीची घोषणाही, मात्र लाभ कधी मिळणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी चेतन पोडे व गणेश उपरे नदीत पोहत असताना वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, ते देखील वाहून गेले. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिंह राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत एकाचा मृतदेह मिळाला होता तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे.