चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील एका खासगी शाळेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कोरपना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांच्या विरोधात सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पालक व शिक्षकांनी कोरपना पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावून संताप व्यक्त केल्याने काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पुण्याच्या एमिनेन्स इंग्लिश स्कूलची शाखा कोरपना येथे आहे. या शाळेचे व्यवस्थापनाचे काम पाहणारे कोरपना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांनी पीडित विद्यार्थिनीला मे महिन्यातील एका रविवारी उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्गाबाहेर बोलावले. त्यानंतर तिला कार्यालयात नेऊन दोन गोळ्या पाण्यासोबत खायला लावल्या. गोळी खाण्यास विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर तिला धमकवण्यात आले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर अमोल लोंढे याने जबरदस्तीने बलात्कार केल्याची तक्रार विद्यार्थिनीने केली आहे. घरी कोणाला सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : राज्यात कारागृह पोलीस भरतीत ‘हायटेक कॉपी’

दरम्यान, घाबरलेल्या विद्यार्थ्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र तिने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला होता. दोन दिवसांपूर्वी तिच्या मित्राने पीडितेच्या आईला याबाबत माहिती दिली. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने मुलीला विश्वासात घेतले आणि तिला सत्य विचारले, त्यानंतर तिने घाबरून घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर आई व मुलीने थेट कोरपना पोलीस ठाणे गाठून आरोपी लोंढे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लोंढे हा कोरपना शहर युवक काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे सुमारे ५ वर्षांपूर्वीही राजुराचे आमदार काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर असाच अत्याचार झाला होता.

हेही वाचा : पंतप्रधान १५ दिवसांत दुसऱ्यांदा विदर्भात…बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस म्हणतात चौकशी सुरू आहे

११ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आरोपी अमोल लोडेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण मे महिन्यातील आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे गडचांदूरचे एसडीपीओ रवींद्र जाधव यांनी सांगितले.