चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच झालेल्या पी.एच.डी. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शोधप्रबंधाकरिता ‘सिनाॅप्सिस’ सादर करण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध होत नसल्याने त्यांची वणवण सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आचार्य पदवीपासून वंचित राहावे लागत आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नुकतीच आचार्य पदवी प्रवेश परीक्षा (पेट) झाली. यामधे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा आचार्य पदवीकरिता प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेत सुरुवातीला त्यांना त्यांच्या विषयाचा मार्गदर्शक (गाईड) ठरवून त्यानंतर प्रत्यक्ष शोधकार्यास सुरुवात करण्यापूर्वी संशोधन केंद्रात शोध प्रबंधाची ‘सिनाॅप्सिस’ सादर करावी लागते. त्यासाठी मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठाच्या जाचक अटीमुळे विद्यापीठात विषयानुरूप पुरेसे मार्गदर्शक उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे मार्गदर्शक मिळत नसल्याने आचार्य पदवी प्रवेश प्रक्रियेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

हेही वाचा : सत्ताधारी आमदारांना ४० कोटींचा निधी; विरोधी पक्षांचे आमदार मात्र वंचित

हेही वाचा : शिंदे-फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; विरोधकांच्या टीकेनंतर बाधितांना सरसकट मदत देण्याची ग्वाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचा परिणाम गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालयात रिसर्च सेंटर नाही. तथापि ज्या महाविद्यालयात रिसर्च सेंटर नाही तेथील प्राध्यापकांना मार्गदर्शक होता येत नाहीं. परिणामी मार्गदर्शकांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांअभावी संशोधन प्रक्रियेत सहभागी होण्यास अडचण होत आहे. विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी, डॉ. मिलिंद भगत, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. दिलीप चौधरी, प्रा. नीलेश बेलखेडे आदींनी शक्य तितक्या लवकर परिपत्रक काढून आचार्य पदवी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली आहे.