चंद्रपूर : काँग्रेस पक्षासाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार की आमदार प्रतिभा धानोरकर ही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार लवकर जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

या लोकसभा क्षेत्रात उमेदवारीवरून पूर्वीपासून वादाची किनार राहिलेली आहे. १९८० ते १९९५ पर्यंत केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तेव्हाही माजी खासदार नरेश पुगलिया यांचे नाव उमेदवारांच्या स्पर्धेत शेवटपर्यंत राहायचे. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या दिवशी माजी खासदार नरेश पुगलिया यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत पुगलिया यांना अगदी सहज उमेदवारी मिळाली. त्यानंतर २००४ मध्येही पुगलिया यांनाच उमेदवारी मिळाली. मात्र, तेव्हा वरोराचे आमदार संजय देवतळे यांचेही नाव चर्चेत आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पून्हा एकदा उमेदवारीसाठी माजी खासदार नरेश पुगलिया व संजय देवतळे यांच्यात स्पर्धा होती. देवतळे यांचे नाव माध्यमांमध्ये जाहीर झाल्यानंतर शेवटच्या क्षणी माजी खासदार पुगलिया यांनी उमेदवारी खेचून आणली होती.

Ranajagjitsinha Patil sharad pawar
“आमदार नसतानाही राणाजगजीतसिंह पाटलांना मंत्री केलं, पण त्यांचे…”, शरद पवार यांचा टोला
rapper fazilpuriya loksabha
बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी
Pankaja Munde, Pankaja Munde campaign rally,
पंकजा मुंडेंच्या प्रचार मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन, आमदार मुंदडा अनुपस्थित
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र

हेही वाचा : मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक अपघात…

२०१४ मध्ये बऱ्याच वादंगानंतर पक्षाने तेव्हाचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी दिली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेसने विनायक बांगडे यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून चोवीस तासापूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस प्रवेश करणाऱ्या सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. धानोरकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा : एकनाथ शिंदे गटाच्या माजी आमदाराचा दावा, म्हणाले, “नवनीत राणांची उमेदवारी…”

दरम्यान, आता पुन्हा २०१९ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षातील तिकिटाच्या या स्पर्धेमुळेच आता आमदार प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूती मिळाली आहे. परंतु, चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेस श्रेष्ठींनी वडेट्टीवार यांचे नाव निश्चित केले आहे. वडेट्टीवार इच्छुक नसतील तरच धानोरकर यांचा विचार होणार आहे. विशेष म्हणजे, वडेट्टीवार यांनी नामनिर्देशन पत्राची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. परंतु, अखरेच्या क्षणापर्यंत आणखी काय राजकीय परिस्थिती बदलते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. वडेट्टीवार यांना धानोरकर यांच्याशिवाय अन्य दुसरा कोणताही उमेदवार चालत असल्याने वडेट्टीवार काय निर्णय घेतात याकडेही लक्ष आहे. काँग्रेस पक्षाकडून वडेट्टीवार व धानोरकर यांचे नाव सुरू असले तरी लोकसभेत कुणबी समाजाचा नवीन व अनपेक्षित चेहरा देऊन धक्कातंत्र वापरले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी देखील अशाचप्रकारे कुणबी समाजाचा चेहरा देऊन धक्का देणार आहे.

हेही वाचा : बुलढाणा: काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… ‘हे’ आहे कारण…

जातीयवादी घोषणा देणाऱ्यांना पक्षातून बाहेर करा

काँग्रेस पक्ष कुठलाही जातीयवाद व धर्मद्वेष पाळत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातही जाती आणि धर्म द्वेषाला जागा नाही. आम्ही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, जातीयवादी राजकारणापासून आम्हाला सावध राहणे जरूरी आहे. जातीयवादी राजकारणाशी आमचा संबंध नाही. काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांपैकी कुणा एकाला उमेदवारी देणार, त्यांचा आम्ही प्रचार करू. मात्र, मागील काही दिवसांपासून पक्षातीलच काही संधीसाधू व भाजपची सुपारी घेतलेले लोक जातीयवाद करत आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाचे राजकारण कलुषित होत आहे. या जिल्ह्यातील ओबीसी, माळी, तेली, कुणबी, न्हावी तसेच मुस्लीम, ख्रिश्चन व बौद्ध धर्मीय तसेच सर्व जातीधर्माचे लोक काँग्रेस पक्षासोबत आहे. काँग्रेस पक्षात दोन दिवसांपूर्वी लागलेले जातीयवादी नारे चिंतादायक आहे. या जातीयवादी नारे देणाऱ्या पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर यांनी केली आहे.