चंद्रपूर : वन्यप्राण्यांसाठी शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने लताबाई लाटकर (५५) व देवीदास इष्टम या दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना आज, गुरुवारी दुपारी उघडकीस आल्या. सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात महेश बोरकर यांच्या शेतात लताबाई लाटकर कामाला गेल्या होत्या. काम करतानाच त्यांचा विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

Trigrahi Yog in Aries
त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ५ राशींना होणार अपार धनलाभ? ३ ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते दारी
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील उसराळा गावातील देविदास इष्टम (३२) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शेताच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने देविदास यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. परिसरात वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे व वाघांसारख्या हिंसक प्राण्यांच्या संचारामुळे शेतकरी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी सर्वत्र विद्युत प्रवाहित तारांचे कुंपण लावतात.