बुलढाणा : महापुरुषांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यातील करोडो रहिवासियांसाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आराध्य दैवत,प्रेरणा स्थान! मात्र त्यांची शिकवण, उपदेश विसरून हेच अनुयायी एकमेका समोर संघर्षाला उभे ठाकतात. यामुळे गावातील सामाजिक समरसता, एकी धोक्यात येते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या वझर गावात दुर्दैवाने हेच घडले.

शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या (अनाधिकृत ) पुतळ्यावरून दोन समाजाचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले. वादाचे पर्यवसन हाणामारी, दगडफेक मध्ये झाल्याने गावात मोठा तणाव निर्माण झाला. खामगाव पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, घटनास्थळी दखल झाले आहे. मात्र अनियंत्रित परिस्थिती आणि संघर्षाची शक्यता आणि सामाजिक तणाव लक्षात घेता जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक, दंगा काबू पथक यांना पाचरण करण्यात आले आहे.

सध्या गावातील तणावं कायम असून कडक पोलीस बंदोबस्त मुळे वझर गावाला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार गावात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनधिकृत पुतळा बसविण्यावरून जोरदार राडा झाला.दोन समाजात तुफान हाणामारी व दगडफेक झाली असून कमिअधिक सहा ते सात गावकरी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वझर गावात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनधिकृत पुतळा बसविण्यावरून जोरदार राडा झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस गावात पोहचले .अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही, पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दल मागविले. आज शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामपंचायतीची ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती.तत्पूर्वी दोन गट एकमेकांना आमने सामने होऊन भिडले. धक्केबुक्की होऊन हाणामारी झाली. तूरळक दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. त्याच पारिसरात काहींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविल्याने वाद निर्माण होऊन जातीय संघर्ष निर्माण झाला. गावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती मोठ्या संख्येतील पोलीस दल परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.