यवतमाळ: गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मारेगाव येथील प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील अनेक घरात गटारातील पाणी शिरले. त्यामुळे नगर पंचायतच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी आज शुक्रवारी सकाळी भर पावसात अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

मारेगाव येथे नगरपंचायत प्रशासन अस्तित्वात आली तेव्हापासून काही प्रभागातील विकासकामे अद्यापही झाली नाही. ३ व ४ या प्रभागात रस्त्याच्या समांतर सिमेंट रोडची उभारणी करण्यात येऊन अरुंद गटारीचे कामे करण्यात आल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. पावसाचे पाणी बाहेर जाण्यास अडसर निर्माण झाला असून अनेकांच्या घरात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हेही वाचा.. पश्चिम वऱ्हाडाला मंत्रिपदाची हुलकावणीच

नगरपंचायत प्रशासनास याबाबत यापूर्वी नागरिकांनी तक्रारी दिल्या, मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे विजय मेश्राम, महेश जूनगरी , विकास गेडाम यांनी भर पावसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून अर्धनग्न आंदोलन केले.

हेही वाचा… यवतमाळ: महागाव व उमरखेडमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की , नगरसेवक नंदेश्वर आसुटकर , नगरसेवक जितेंद्र नगराळे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलन मागे घेण्याची विनवणी केली. मात्र ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला.