नागपूर : एअर इंडियाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे शुक्रवारी नवीन विमान उतरवले. मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) प्रवासी वाहतुकीसाठी विमान वापरण्यापूर्वी विमान एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर नेणे आवश्यक असते. त्यानंतर डीजीसीए विमानाच्या व्यावसायिक उपयोगास मान्यता देत असते. त्यानुसार एअर इंडियाचे नवीन ए-३५० विमान नागपूर विमानतळावर उतरले.

‘एअर इंडिया’ने अलिकडे जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमान खरेदी कराराला अंतिम स्वरूप दिले. टाटा समूहाच्या मालकीची ही विमान वाहतूक कंपनी ४७० विमानांची खरेदी करणार असून एअरबस आणि बोइंग या जगातील दोन बड्या कंपन्यांशी त्याबाबत करार करण्यात आला आहे. या विक्रमी विमान करारामुळे ‘एअर इंडिया’च्या ताफ्यात नवीन आले आहेत. ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ ही फ्रेंच कंपनी आणि ‘बोइंग’ ही अमेरिकी कंपनी यांच्याशी करार केला. त्यानुसार ‘एअरबस’ ही कंपनी २५० आणि बोईंग ही कंपनी २२० विमाने देणार आहेत. ‘एअर इंडिया’ने योजलेल्या विस्तार आराखड्यानुसार ही खरेदी करण्यात येत आहे.

हेही वाचा : सावधान! दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी आढळल्यास ‘ही’ कारवाई होणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या करारानुसार एअर इंडिया वाइड बॉडी (दीर्घ व अतिदीर्घ पल्ला) आणि नॅरो बॉडी (लघू व मध्यम पल्ला) विमाने खरेदी केली जात आहेत. ‘एअरबस’कडून एअर इंडियाला ४० वाइड बॉडी ए ३५० विमाने, २१० नॅरोबॉडी सिंगल- आइल ए ३२० निओस विमाने दिली जाणार आहेत. ‘बोइंग’सोबतच्या करारानुसार १९० बी ७३७ मॅक्स विमाने, २० बी ७८७ विमाने आणि १० बी ७७७ एक्स विमाने उपलब्ध होणार आहेत. वाइड- बॉडी विमाने अति- लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी वापरली जाणार आहेत. ज्या प्रवासाचा कालावधी १६ तास किंवा त्यापेक्षा अधिक असतो, अशा प्रवासासाठी ही विमाने वापरली जातील. या विमानांना अल्ट्रा- लाँग हॉल फ्लाइट म्हणतात.