नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातून त्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवड्याभरातच पोलीस निरीक्षक पदांवर पदोन्नती मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक विभागात योग्य समन्वय नसल्याने पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला खीळ बसली होती. राज्य पोलीस दलाच्या १०२ आणि १०३ क्रमांकाची तुकडी सध्या पदोन्नतीच्या कक्षेत आहेत. १०२ क्रमांकाच्या तुकडीतील अर्धेअधिक अधिकारी पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर अर्धे अधिकारी अजूनही सहायक पोलीस निरीक्षक पदावर कर्तव्य बजावत आहेत.

दोन वर्षांपासून अनेक अधिकारी ‘बॅचमेट’ असलेल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करीत होते. पदोन्नतीसाठी कोणतीही अडचण नसतानाही १०२ क्रमांकाच्या तुकडीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत नव्हती. मात्र, गेल्या महिनाभरापूर्वीच पदोन्नतीसाठी गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवड्याभरात सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका

हेही वाचा : देशभरातील वीज पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका, वीज कामगार उद्या निदर्शने करणार; कारण काय? जाणून घ्या…

राज्य पोलीस दलात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वानवा आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती न मिळाल्याने अनेक पदे रिक्त आहेत. तसेच पोलीस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत ७०० ते ७५० पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची आवश्यकता पोलीस दलाला आहे. मात्र, पदोन्नतीची प्रक्रिया अगदी मंदगतीने होत असल्याने रिक्त पदाची जबादारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याची नामुष्की वरिष्ठांवर ओढवत आहे.

हेही वाचा : रस्त्यावर थरार; धावत्‍या मिनीबसवर गोळीबार

राज्यात पोलीस निरीक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात त्यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येईल.

संजीव कुमार सिंगल (अप्पर पोलीस महासंचालक), आस्थापना विभाग, मुंबई</cite>