नागपूर : मतदार ग्रामीण किंवा शहरी किंवा दुर्गम भागातील असो, आमच्यासाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाला केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम गावागावात जाऊन करणार आहे. उद्या सकाळपर्यंत माझा मुक्काम पारडसिंगाला राहणार असून गावातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘गाव चलो अभियाना’ला सुरुवात करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस काटोल तालुक्यातील पारडसिंगा या गावी पोहोचले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. भाजपच्या वतीने गाव चलो या या अभियानाच्या माध्यमातून सात लाख गावात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज काटोलपासून याची सुरुवात केली आहे. पारडसिंगा या गावी मी मुक्कामी राहणार असून या ठिकाणी महिला , युवक आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे फड़णवीस यांनी सांगितले.
हेही वाचा : VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती
जे काही शासकीय कार्यक्रम, लाभार्थ्यांचे लाभ देण्याचे कार्यक्रम असतील ते समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचविले जातील. शिवाय भेटीगाठी होतील. भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पारडसिंगा येथील वस्तीत जाऊन लोकांना भेटणार आहे. मतदार ग्रामीण असो की शहरी असो की दुर्गम भागातील असो प्रत्येक मतदार हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने मोदीजींचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे. केवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही तर ३६५ दिवस जनतेच्या हिताच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने विविध उपक्रम सुरू असतात असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : भाजपच्या महिला मेळाव्याला गर्दी जमवण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर?
पारडसिंगा येथे कार्यकर्ता आणि महिला मेळाव्याला जाऊन संवाद साधणार आहे. त्यानंतर सुपर वॉरिअर्स सोबत बैठक व चर्चा केली जाईल. सायंकाळी बुथ प्रमुख आणि जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. रात्रभर पारडसिंगा येथे मुक्कामी असणार असून उद्या सकाळी गावात काही कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.