नागपूर : झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानासह दहा ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला होता. यात ३५४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ६ विधानसभा मतदारसंघांत निषेध आंदोलन केले. यावेळी धीरज साहू यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. तसेच राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.

‘७० वर्ष देश लुटला, काँग्रेसने फक्त पैसा खाल्ला’, ‘काँग्रेस हटाव, देश बचाव’, अशा आशयाच्या घोषणा यावेळी भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. सक्करदरा चौकात शहर अध्यक्ष बंटी कुकडे, अर्चना डेहनकर आणि आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : “शेतकरी मेले तरी चालेल, अशी मोदी सरकारची भूमिका”, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

धीरज साहू हे काँग्रेसचे खासदार असताना त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती कोणाची आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींचा निषेध केला. या विषयावर इंडिया आघाडी गप्प का, असा प्रश्न यावेळी भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “काश्मिरी पंडितांच्या घरपरतीची गॅरंटी पंतप्रधान मोदी घेणार का?” उद्धव ठाकरे यांचा प्रश्न; म्हणाले, “असा कोण आहे जो…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे व मंडळ महिला अध्यक्ष संतोष लढ्ढा यांच्या नेतृत्वात सतरंजीपुरा चौकात, मध्य नागपुरात आमदार विकास कुंभारे, कविता इंगळे, दक्षिण पश्चिम मतदारसंघात अनसुया गुप्ता, किशोर वानखेडे, उत्तर नागपुरात डाॅ. आमदार मिलिंद माने आणि सरिता माने यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वच आंदोलनस्थळी धीरज साहू यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला.