नागपूर : भारतातील पहिल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राने आजतागायत हजारो प्राणी आणि पक्षी तसेच त्यांच्या बछड्यांची काळजी घेऊन त्यांना सुरक्षित अधिवासात सोडले आहे. ज्यांना धड चालताही येत नाही, अशा प्राण्यांना त्यांनी उभेच केले नाही तर धावायला शिकवले. कित्येकांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना नैसर्गिक अधिवासात उडायला शिकवले. मात्र, या कोल्ह्याची कथा त्यापेक्षाही वेगळी आहे. तो केंद्रात आला तेव्हाच तो अवघ्या १५ दिवसांचा होता. तो वाचेल की नाही अशी त्याची अवस्था होती. मात्र, त्याच्यावर उपचार करणारे केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला जीवनदान दिले आणि तो मोठा होऊन आता तब्बल आठ महिन्यांनी त्याच्या नैसर्गिक अधिवासात रवाना झाला.
हेही वाचा : रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगची नवी शक्कल
मार्च महिन्यात अमरावती महामार्गावर एका मादी कोल्ह्याचे १५ दिवसांचे पिल्लू निर्जलित आणि उपासमारीच्या अवस्थेत नागपूर सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या अखत्यारितील भारतातील पहिल्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आणले होते. तपासणीच्यावेळी त्याचे प्रचंड निर्जलीकरण झाले होते आणि ते उपासमारीने त्रस्त होते. त्या पिल्लाचे वजन फक्त ३२० ग्रॅम होते आणि डोळेही उघडायचे होते. अशावेळी ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राने त्या पिलाचे पालकत्व स्वीकारले. त्याला केंद्राच्या बालरोग वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. निर्जलीकरण आणि उपासमारीतून त्याला सावरण्यासाठी शेळीच्या दुधासह नैसर्गिक फॉर्म्युला असलेले दूध दिले गेले. कोल्ह्याच्या पिल्लाला दिवसातून पाच वेळा आहार दिला जात होता. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या बालरोग कक्षामध्ये कोल्हाला सखोल निरीक्षण आणि काळजीखाली ठेवण्यात आले होते. या कक्षात अनाथ प्राण्यांच्या स्वच्छतेची आणि आरोग्याची अत्यंत काळजी घेतली जाते.
नागपूर: मार्च महिन्यात अमरावती महामार्गावर एका मादी कोल्ह्याचे १५ दिवसांचे पिल्लू निर्जलित आणि उपासमारीच्या अवस्थेत आढळून आले होते. त्याच्यावर आठ महिने उपचार केल्यानंतर वनविभागाने कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. pic.twitter.com/mLUZEyilSc
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) November 30, 2024
जसजसे कोल्ह्याचे वजन वाढले आणि तो योग्य वयात आला, तसतसे हानिकारक विषाणू आणि जीवाणूंविरूद्ध त्याचे लसीकरण करण्यात आले. कोंबडीच्या मांसाशी हळूहळू कोल्ह्याच्या त्या पिल्लाची ओळख झाली. मल्टिव्हिटामिन्स आणि कॅल्शियमची नियमित पूर्तता नियमित जंतनाशकासह केली गेली. वजनात हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून आले जे कोल्ह्याच्या त्या पिलाचे निरोगी होण्याचे चांगले लक्षण होते. सात महिन्यांच्या पालनपोषणानंतर कोल्ह्याच्या त्या पिलाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय झाला. नोव्हेंबर महिन्यात त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सोडण्यात आले. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण भाऊक करणारा होता, कारण त्यांनी जीवदान दिलेला आणि त्याचे पालनपोषण करुन मोठा केलेला कोल्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासाकडे झेप घेत होता.