नागपूर: नागपूरसह राज्यात सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. परंतु गेल्या सात दिवसांची स्थिती बघता १२ मार्चच्या तुलनेत १८ मार्चच्या दुपारी नागपूरात सोन्याच्या दरात चांगली घसरण झालेली दिसत होती. या काळात २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल ३०० रुपये प्रति दहा ग्रामने कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना आंशिक दिलासा मिळाला आहे. नागपूरसह राज्यात गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सोन्याचा दरात वाढ होतांना दिसत आहे. बघता बघता २४ कॅरेट सोन्याचे दर नागपुरात ६३ हजार रुपये प्रति १० ग्रामवरून ६६ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत पोहचले होते. नागपुरात सोमवारी (१२ मार्च) दुपारी १.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६५ हजार ७०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे दर ६१ हजार १००, १८ कॅरेटसाठी ५१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४२ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ७०० रुपये होते.

हेही वाचा : “…हा तर बालिशपणा,” ईव्हीएमच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार का भडकले?

pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
Nagpur, Gold Prices Drop, Continuous Increase, gold price drop in nagpur, nagpur gold price, today gold price, gold price decrease, gold in nagpur, nagpur news, gold news, marathi news,
खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…

दरम्यान नागपुरात १२ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६५ हजार ९०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे दर ६१ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ५१ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४२ हजार ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७३ हजार ६०० रुपये होते. तर ४ मार्चच्या दुपारी १२.४० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६३ हजार ८०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे दर ५९ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ४९ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४१ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७१ हजार ६०० रुपये होते. दरम्यान सोन्याच्या दरात सातत्याने घटीच्या तुलनेत वाढ जास्त होत असल्याने लग्न समारंभासह विविध कारणांनी सोन्या- चांदीचे दागीने खरेदी प्रस्तावित असलेल्या कुटुंबात चिंता वाढली आहे.