नागपूर: सोन्याच्या दरात करोनानंतर सातत्याने वाढ होत आहे. त्यातच मागील काही दिवसात दर जास्तच वाढल्याने बघता- बघता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम मंगळवारी (२२ एप्रिल २०२५ रोजी) १ लाख रुपयांवर पोहचले आहे. हे दर १०० वर्षांपूर्वी १९२५ मध्ये १८.७५ रुपये प्रति दहा ग्राम होते. त्यानंत वर्षनिहाय सोन्याचे दर काय होते? हे आपण बघू या.

देशाच्या रत्न व आभूषण उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी)चे अध्यक्ष व नागपुरातील रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, वर्ष १९२५ मध्ये देशात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १८.७५ रुपये होते. हे दर दहा वर्षांनी वर्ष १९३५ मध्ये ३०.८१ रुपये झाले. त्यानंतर दहा वर्षांनी वर्ष १९४५ मध्ये हे दर ६२ रुपये नोंदवले गेले.

वर्ष १९५५ मध्ये सोन्याचे दर ७९ रुपये, वर्ष १९६५ मध्ये ७२ रुपये, वर्ष १९७५ मध्ये ५४० रुपये, वर्ष १९८५ मध्ये २ हजार १३० रुपये, वर्ष १९९५ मध्ये ४ हजार ६८० रुपये, वर्ष २००५ मध्ये ७ हजार रुपये, वर्ष २०१५ मध्ये २६ हजार ८४५ रुपये, वर्ष २०२५ मध्ये १ लाख रुपये नोंदवले गेल्याचेही राजेश रोकडे यांनी शेअर केलेल्या माहितीतून पुढे आले आहे. त्यामुळे जुन्या काळात सोन्याच्या धातूमध्ये गुंतवणूक करमाऱ्यांना मोठा लाभ झाल्याचे हे आकडे सांगत आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात मंगळवारी (२२ एप्रिल २०२५ रोजी) जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ९९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७७ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे दर प्रति किलो ९७ हजार रुपये नोंदवले गेले. प्लॅटिनम धातूचेही दर प्रति दहा ग्राम ४४ हजार रुपये नोंदवले गेले.

सोन्याचे प्रति दहा ग्राम दर (प्रत्येक ५ वर्षातील)

वर्ष – दर रुपयांत

१९२५ – १८.७५

१९३० – १८.०५

१९३५ – ३०.८१

१९४० – ३६.०५

१९४५ – ६२.००

१९५० – ९७.१८

१९५५ – ७९.००

१९६० – १११.००

१९६५ – ७२.००

१९७० – १८४.००

१९७५ – ५४०.००

१९८० – १३३०.००

१९८५ – २१३०.००

१९९० – ३२००.००

१९९५ – ४६८०.००

२००० – ४४००.००

२००५ – ७०००.००

२०१० – १८,५००.००

२०१५ – २६८४५.००

२०२० – ४८४८०.००

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५ – १०००००.००