नागपूर : उपराजधानीतील विविध भागांत होळीत (२५ मार्च) अति मद्यप्राशन करून काहींनी रस्त्यावर हैदोस घातला. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून शंभरावर रुग्ण शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयात नोंदवले गेले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये तब्बल ६३ रुग्णांची नोंद झाली. त्यात मद्य प्राशन करून वाहन चालवताना रस्ते अपघात होऊन जखमी, मद्यप्राशन करून वाहनाने धडक दिल्याने जखमी, मद्यप्राशन करून हाणामारी, रंग डोळ्यात जाणे, रंगामुळे त्वचेसह इतर संक्रमण असलेल्या रुग्णांचा समावेश होता. मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयात होळीत अति मद्यप्राशनामुळे अपघात झालेले सर्वाधिक ८० टक्के रुग्ण हे १८ ते ३२ वयोगटातील आहे. तर मद्य घेतल्यावर विविध कारणांनी हाणामारी झालेल्यांमध्ये साठीतील दोघा वृद्धांचा समावेश आहे.

हेही वाचा – ५४ वर्षांनंतर कॉंग्रेसकडून चंद्रपूरमध्ये महिला उमेदवार

मेडिकल-मेयो प्रशासनाने होळीमध्ये या पद्धतीचे रुग्ण वाढत असल्याचे बघत आधीच ट्रामा केअर सेंटर, आकस्मिक अपघात विभागात अतिरिक्त डॉक्टरांची सोय, आवश्यक औषधांची उपलब्धता, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे रुग्ण येथे जाताच तातडीने सगळ्यांवर उपचार सुरू केले गेले. या रुग्णांपैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर बऱ्याच रुग्णांना काही तासात नशा उतरल्यावर सुट्टी दिली गेली. तर मेडिकलमध्ये दगावलेल्या अवस्थेत आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका २५ वर्षीय तरुण आणि दुसऱ्या २७ वर्षीय तरुणाचा समावेश होता. दोघांचाही अपघातानंतर मृत्यू झाला असला तरी त्यांनी मद्य प्राशन केले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या पुढे येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेडिकल, मेयोत एवढे जखमी आलेल्या वृत्ताला दोन्ही रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेडिकल, मेयोत ६५ रुग्णांची नोंद

मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २५ मार्चला होळीशी संबंधित एकूण ६३ रुग्ण आले. तर मेडिकलला रस्ते अपघातात आधीच दगावलेल्या अवस्थेत आलेल्यांचीही नोंद झाली. दोघांनी मद्य घेतले होते. मेडिकलला आलेल्या एकूण रुग्णांत हाणामारी व पडून जखमी ८ रुग्ण, रस्ता अपघाताचे २४, रंगामुळे जखमी ३ असे एकूण ३५ रुग्ण आले. तर मेयोत हाणामारी व पडून जखमी १५ रुग्ण, रस्ते अपघात ९, अति मद्यप्राशन केलेले १, रंगामुळे जखमी झालेले ३ असे एकूण २८ रुग्ण नोंदवले गेले.