नागपूर : जानेवारी २०२३ मध्ये नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांसाठी धाव स्पर्धा घेण्यात आली होती. यात एका ज्येष्ठ नागरिक धावपटूचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे एका दिवंगत खेळाडूच्या पत्नीला अपघात विम्याचा लाभ मिळू शकला. गडकरी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी जानेवारीमध्ये हा महोत्सव झाला. यात ज्येष्ठांची धावण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेदरम्यान रवींद्र चिखलकर या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता.त्यामुळे चिखलकर कुटुंबावर संकट कोसळले. दरम्यान, स्पर्धेच्या कालावधीत महोत्सवात सहभागी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व त्यांचे सहकारी अशा एकूण ४० हजार लोकांचा दोन लाखांचा विमा न्यू इंडिया एशुरन्स कंपनीकडून काढण्यात आला होता.

हेही वाचा : नागपूर : घटस्फोटीत महिलेवर युवकाचा बलात्कार

चिखलकर यांच्या मृत्यूनंतर या विम्याचा दावा करण्यात आला. कंपनीने हा दावा मान्य केल्यानंतर गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते स्व. रविंद्र चिखलकर यांच्या पत्नी रेखा चिखलकर यांना २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संदीप जोशी, आशीष मुकीम, पियूष आंबुलकर आणि न्यू इंडिया एशुरन्स कंपनीचे अधिकारी आकाश आवळे यांची उपस्थिती होती. एका भव्य स्पर्धेचे आयोजन करताना खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय खासदार क्रीडा महोत्सवाचा भाग झालेला प्रत्येक खेळाडू किंवा प्रशिक्षक आपल्या कुटुंबाचा भाग आहे, या विचाराने नितीन गडकरी यांच्या सूचनेनंतर खेळाडूंचा विमा काढण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.