नागपूर : देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना ‘एकलव्य’ ही संस्था मार्गदर्शन करत असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ हा कार्यक्रम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे यांना दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली होती. वंचितांच्या मुलांना परदेशात पीएचडी शिक्षण मिळवण्यासाठी तीन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. खेड शिवापूर मधील अफार्म सेंटर याठिकाणी ६ ते ८ ऑक्टोबर यादरम्यान बूट कॅम्प पार संपन्न झाला. १८ राज्यातून आलेल्या ७५ मुलांनी या कार्यशाळेत हजेरी लावली होती.

जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये आणि शिष्यवृत्तीमध्ये वंचित घटकातील पीएचडीसाठीचे कमी असणारे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन कार्यशाळा घेणारा देशातील हा पहिलाच उपक्रम होता. एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक अशा पद्धतीने एकलव्यकडून १८ राज्यातील ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना ८ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. कला, विज्ञानपासून तंत्रज्ञानापर्यंत विविध शाखांमधील विद्यार्थी या कार्यशाळेसाठी सहभागी झाले होते. पीएचडीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरील मार्गदर्शनासाठी चर्चासत्र, गटचर्चा आणि विविध उपक्रम याअंतर्गत पार पडले.

हेही वाचा : “काँग्रेसच्या काळात तयार झालेले शासकीय रुग्णालय आता भाजपकडून खराब केले जात आहे”, नाना पटोलेंची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून असीम सिदक्की (अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी), अंबरीश डोंगरे (आयआयएम, अहमदाबाद), आरुषी माथूर (पीएच.डी. स्कॉलर, युके), अमन बॅनर्जी (कॉर्नेल युनिव्हर्सिटी, अमेरिका), कबीर जोशी (पीएच.डी. स्कॉलर, युके), सायली ठुबे (ऑक्सफर्ड, केंब्रिज स्कॉलर) यांनी अत्यंत साध्या सोप्या मांडणीमध्ये पीएचडीची प्रक्रिया विद्यार्थांना विविध उपक्रमांद्वारे समजावून सांगितली. यामध्ये गटचर्चा, पॅनल डिस्कशन, वन टू वन मेंटरशिपचा समावेश होता.