नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंची गर्दी होते. मोठ्या प्रमाणात अनुयायी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेने नागपूरला येतात. यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मागील आठवड्यात याविषयावर ॲड. अविनाश काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका टाकली होती.

उच्च न्यायालयाने यावर रेल्वे प्रशासनाला १८ ऑक्टोबर पर्यंत उत्तर द्यायला सांगितले होते. ॲड. काळे यांची ही याचिका आता वादात अडकली आहे. विविध संघटनांच्या वतीने उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली गेली आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य सुरई ससाई यांच्या वतीने ही एक मध्यस्थी याचिका दाखल केली गेली आहे.

हेही वाचा : वायुसेनेचे मिथिल देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. शैलेंद्र नारनवरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीवर दाखल केलेली याचिका जनहिताची नसून व्यक्तिगत कारणाने दाखल केली गेली आहे, असे याचिकेत सुरई ससाई यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था करावी तसेच सुरक्षारक्षक नेमावे, अशी मागणीही मध्यस्थी याचिकेत केली गेली आहे.