नागपूर : काकीला सोडायला आलेल्या एका १४ वर्षीय मुलीने धावत्या रेल्वेगाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यात ती रेल्वेगाडी आणि फलाटाच्या फटीत पडली. सुदैवाने तेथे तैनात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने धावत जाऊन तिला ओढले आणि तिचे प्राण वाचवले. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक ८ वरील आहे.

हेही वाचा : माजी गृहमंत्र्यांच्या भावाची भागीदारांसह फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर ते मुंबई दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईला निघालेल्या सोनाली गिरी स्थानकावर पोहचल्या. त्यांना सोडण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पल्लवी गिरी आणि तिची मुलगी निधी गिरी देखील आली होती. या दोघी सामान आसनापर्यंत पोहचवण्यासाठी डब्यात चढल्या. दरम्यान गाडी सुरू झाली. गाडी सुटल्याचे लक्षात येताच निधीने धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. तिचा पाय घसरला आणि ती गाडी आणि फलाटच्या फटीत ती पडली. येथे तैनात आरपीएफ जवान जवाहर सिंह याने लगेच तिला बाहेर ओढले. त्यामुळे निधीचे प्राण वाचले.