नागपूर : पतीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या महिलेने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी म्हाळगीनगरात उघडकीस आली. सोनाली अजय खर्चे (३८, साई एजन्सी अपार्टमेंट, म्हाळगीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनाली यांनी अजय खर्चे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी पती अजय यांचे करोनाने निधन झाले. तेव्हापासून त्या सदनिकेत मुलीसह राहत होत्या. त्या एका बँकेत नोकरीवर होत्या. शेजारी राहणाऱ्या आई-वडिलांकडे त्या मुलीला सोडून बँकेत जात होत्या. बँकेतून परत येताना मुलीला घेऊन घरी जात होत्या.

हेही वाचा : “गुडघ्याला बाशिंग बांधून रोहित पवारांचा नेता बनण्याचा प्रयत्न”, राम शिंदे यांची संघर्ष यात्रेवरून टीका; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७ डिसेंबरला त्या मुलीला आईवडिलांच्या घरी सोडून नोकरीवर निघून गेल्या. त्याच दिवशी मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे त्या मुलीला घ्यायला आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे नोकरीवर निघून गेल्या. मात्र, शनिवारी त्या मुलीला घ्यायला आल्या नाहीत. आईने सोनाली यांना फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. ९ डिसेंबरला वडिल मुलीच्या घरी गेले. तर त्यांना दार आतून लावलेले दिसले. त्यांनी आवाज दिला असता मुलीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना गोळा करून दरवाजा तोडला. सोनाली या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक पांडे यांनी पंचनामा केला. घटनास्थळावर ‘सुसाईड नोट’ आढळून आली नाही. पतीच्या विरहात सोनाली यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.