लोकसत्ता टीम

भंडारा : जिल्ह्यात सध्या सर्वत्र शंकरपटाची धूम आहे. शंकरपट म्हटले की लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. बैलगाड्यांच्या शर्यतीला पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, शंकरपटादरम्यान अनेक दुर्घटनादेखील घडतात. सध्या सोशल मीडियावर भंडारा जिल्ह्यातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शर्यतीत एक बैलगाडी तुफान वेगाने जात असताना एक वयोवृद्ध त्या बैलगाडी पुढे आला आणि आऊट ऑफ कंट्रोल असलेल्या त्या बैलगाडीने थेट त्याला उडवले. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे ते वृद्ध सुदैवाने वाचले.

ही घटना थरारक घटना लाखनी तालुक्यातील सेलोटी गावात शंकरपटादरम्यान घडली. बिंदू गणवीर, रा. सेलोटी असे या वृद्धचे नाव असून ते कर्णबधिर असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री महोदय, ऑल इज वेल आहे का?’ खुले पत्र लिहून ‘कोणी’ विचारले प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलोटी गावात मनेगाव बेला येथे १५ व १६ जानेवारी रोजी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील लोकांची गर्दी उसळली होती. शर्यत सुरू होताच पटाचे बैल वाऱ्याच्या वेगाने धावू लागले. शर्यतीचा आनंद घेत असतानाच बैलगाडी दिसताच लोकांनी रस्ता मोकळा केला मात्र त्याच वेळी वयोवृद्ध गणवीर बैलगाडीच्या समोर आले आणि तेथेच उभे राहिले. वेगात असलेल्या बैलजोडीला आवरणे अशक्य होते. त्यामुळे ती थेट त्या सत्तर वर्षीय वृद्धांच्या अंगावर आली. यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचां व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.