विधान परिषदेच्या विदर्भातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. या ठिकाणी भाजपची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपला विदर्भात उतरती कळा लागली, अशी टीका बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्या विजयानंतर बुलढाण्यात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यात कार्यकर्त्याप्रमाणे सहभागी झालेले सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. पाचपैकी चार जागी आघाडीचा विजय म्हणजे ‘पन्नास खोके एकदम ओके’ ला जनतेने दिलेले प्रत्युत्तर असल्याचे सपकाळ म्हणाले. केंद्रात आणि राज्यात हुकूमशाहीवादी कारभार हाकणाऱ्या भाजपला मतदारांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. बुलढाण्याला एका सज्जन व सभ्य आमदाराची गरज होती, ती या विजयाने पूर्ण झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.