वर्धा : घरपोच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यात आज पहिली नोंद मालती मधुकर सालोडकर यांची झाली आहे.त्यांनी आजवर एकही मतदान चुकविले नाही. पायपीट करीत त्या नातवांडांना सोबत घेत आवर्जून मतदान केंद्रावर जायच्या. आता घरपोच सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानतात.

येथील १ हजार ६३५ मतदार करणार गृह मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांना गृह मतदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात असून ज्या दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांनी १२ डी नमुना भरुन दिला आहे. त्यांनाच १२ एप्रिल २०२४ पासून गृह भेटीव्दारे मतदान करता येणार आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण १ हजार ६३५ मतदार गृह मतदान करणार आहेत. वर्धा लोकसभा क्षेत्रात ८५ वर्षावरील २५ हजार २२ मतदार आहेत. त्यामध्ये १२ डी नमुना सादर केलेले एकूण मतदार १ हजार ३३५ मतदार आहे. तसेच ११ हजार ८२४ दिव्यांग मतदार असून ३०० दिव्यांग मतदारांनी १२ डी नमुना सादर केला आहे.

Rules for political parties to use state funded media during polls Sitaram Yechury G Devarajan
“मुस्लीम, हुकूमशहा शब्द वापरु नका!” प्रसार भारतीने कोणत्या नियमांअंतर्गत विरोधकांवर कारवाई केली?
Mahavitarans Go Green scheme to save money on electricity bills
वीज देयकांत पैसे वाचवायचे असतील तर ‘ही’ आहे योजना…
Akhil Bharatiya Marathi Natya Parishad, Voting Awareness, Pimpri Chinchwad, Maval Lok Sabha Constituency, new voters, voting awareness in new voters, lok sabha 2024, election 2024, Vasudev, Vasudev spreads voting awareness, pimpri news, pimpri chinchwad news,
पिंपरी : नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती
first elections conducted using EVMs
EVM वापरून झालेल्या पहिल्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या रद्द, नेमके काय घडले होते?
Waiting for Upazila Hospital of Uran possibility of funds getting stuck in code of conduct of elections
उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, निवडणुकीच्या आचारसंहितेत निधी अडकण्याची शक्यता
Supreme Court Notice To Election Commission on NOTA
‘नोटा’ला सर्वाधिक मतदान झाल्यास काय होणार? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग

हेही वाचा : नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?

दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एकूण १ हजार ६३५ मतदार गृह मतदान करणार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघात गृह मतदान प्रक्रियेसाठी एकूण ७८ पथके कार्यरत राहणार असून ११ पथके राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये धामणगाव रेल्वे येथे २०पथके, मोर्शी येथे १५ पथके, आर्वी येथे १५ पथके, देवळी येथे १० पथके, हिंगणघाट येथे १० पथके, वर्धा येथे ८ पथके कार्यरत राहणार आहेत.

हेही वाचा : Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात

मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा या पाच विधानसभा मतदार संघात दि. १२ एप्रिल २०२४ पासून या मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार असून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात १७ एप्रिल २०२४ पासून गृह मतदानाला सरूवात होणार आहे. मोर्शी येथे दोन दिवस १२ व १३ एप्रिल २०२४रोजी, आर्वी येथे तीन दिवस १२ ते १४ एप्रिल २०२४ रोजी, देवळी येथे तीन दिवस दि. १२, १३ व १८ एप्रिल २०२४ रोजी, हिंगणघाट येथे तीन दिवस १२ ते १४ एप्रिल २०२४ रोजी, वर्धा येथे सहा दिवस १२ ते १७ एप्रिल २०२४ व धामणगाव येथे ४ दिवस 17 ते 20 एप्रिल २०२४ या कालावधीत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गृह भेटीव्दारे मतदानाची प्रक्रिया चालणार आहे.