यवतमाळ : कारंजा येथील एका खासगी बाजार समितीत प्रथम हळद विकणारा शेतकरीच कळंब तालुक्यातील सोनेगाव शेतशिवारातील चोरी प्रकरणात चोर म्हणून अडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सचिन पाटील (३३, रा. सोनेगाव, ता. कळंब) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, माणिक गोविंदराव रुईकर (६०, रा. सोनेगाव रुईकर ता. कळंब, ह.मु. पांडे ले-आऊट नागपूर) यांनी १ मे रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी सोनेगाव शेतशिवारातील शेतात असलेल्या बंड्याच्या गेटचे समोरून कुलूप तोडून तीन क्विंटल तूर, तीन क्विंटल गहू, १५ क्विंटल हळद, सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

हेही वाचा : नागपूर: मेट्रोत नोकरी देण्याचे आमिष, सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलसीबी पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. अशा सचिन पाटील व वैभव दुदुरकर या दोघांनी शेतमाल कारंजा येथे विक्री केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्या दोघांनी हळद व तूर चोरी केल्याची कबुली देली. दरम्यान एलसीबी पथकाने बोलेरो पिकअपसह कारंजा येथील अडत व्यापारी यांना विक्री केलेली ८६३ किलो हळद व १२० किलो तूर असा एकूण पाच लाख २५ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे कारंजा खाजगी बाजार समितीत हळद विक्रीसाठी आल्यामूळे शेतकरी सचीन पाटील याचा सत्कार करण्यात आला होता. आता हाच सचिन अटकेत असल्याने गावात विविध चर्चा आहे.