यवतमाळ : कॉटनसिटी रनर्स फाऊंडेशनच्या वतीने आज रविवारी येथे आयोजित ‘यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन’मध्ये दोन हजारांवर धावपटू आरोग्यासाठी जनजागृती करत धावले. मॅरेथॉनचे हे दुसरे पर्व होते. चार गटांत झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील धावपटू सहभागी झाले होते. २१, १०, पाच व तीन अशा चार गटातील धावटूंसाठी झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन पहाटे ६ वाजता येथील नेहरू स्टेडियमवर झाले. स्पर्धेत सहभागी धावपटूंना चिअर अप करण्यासाठी शेकडो यवतमाळकर नेहरू स्टेडियम तसेच धाव मार्गिकेवर उपस्थित होते.

हेही वाचा : खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ; आयकर विभागाकडून कोंडी, मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प अभियानातून यवतमाळ-वाशीम वगळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजेत्यांना बक्षीस, मेडल, प्रमाणपत्र ‍‍देऊन सन्मानित करण्यात आले. तीन किमीसाठी फन रनमध्ये व पाच किमीच्या रनमध्ये सर्वाधिक नागरिक सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘वर्ल्ड मॅरेथॉन ऑर्गनायझेन’कडून मान्यताप्राप्त असल्याने राज्यातील धावपटू सहभागी झाले.