यवतमाळ : शिकवणी वर्गाकडे निघालेल्या तरूण शिक्षिकेस एका ट्रकने धडक दिली. त्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली. तिच्या उपचारासाठी १५ ते २० लाखांचा खर्च सांगण्यात आला. मात्र आठ दिवस मृत्यूशी झुंड दिल्यानंतर या शिक्षिकेचा मृत्यू झाला. ऐश्वर्या मधुसूदन बर्डे, (२३, रा. हुनमान वार्ड, पुसद) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. २० सप्टेंबर रोजी दुपारी ऐश्वर्या या दुचाकी (क्र. एमएच २९,बीएल ८९०६) ने शिकवणी वर्गाला जात होत्या. त्यावेळी पुसद येथील छत्रपती चौकात ट्रक (क्र= एमएच १२, एसएफ ९८५२) ने त्यांच्या दुचाकीस धडक दिली.

हेही वाचा : नागपूर करार विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ॲड. वामनराव चटप; विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात ऐश्वर्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली पडल्या. या अपघातात त्यांच्या पोटाला व पायाला जबर मार लागला. त्यांना आधी पुसद व नंतर हैद्राबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर विविध शस्त्रक्रियांसाठी १५ ते २० लाख रूपये खर्च सांगण्यात आला. नातेवाईकांकडून या रकमेची जुळवाजुळव सुरूअसतानाच आठ दिवस मृत्यूशी झुंज देत ऐश्वर्या यांनी गुरूवारी २९ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ऐश्वर्याच्या मृत्यूने पुसद शहरात शोककळा पसरली असून शहरातील जड वाहतुकीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.