चंद्रपूर:दारू पिऊन आईसोबत वाद घालत मारहाण करणा-या मुलाला सोडवत असताना मुलाने वडिलालाही मारहाण केल्याने वडिलांना स्वतःच्या संरक्षणाकरिता बैलबंडीच्या उधारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यु झाला.

सदर घटना मूल तालुक्यातील येसगाव येथे सोमवारी रात्री ८ वाजता घडली. चंद्रशेखर नागेंद्र वाढई ( ३५) असे मृतक मुलाचे नांव आहे. तर नागेंद्र पांडुरंग वाढई (६५) असे आरोपी वडिलाचे नांव असून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

मूल तालुक्यातील येसगांव येथील नागेंद्र वाढई यांना तिन मुले आहे. एकाचा काही वर्षापुर्वी मृत्यु झाला. एक मुलगा कामानिमीत्य बाहेरगावी राहात आहे. तर चंद्रशेखर हा अविवाहीत होता, तो आपल्या आई-वडीलासोबत राहात होता. चंद्रशेखर व्यसनाधीन होता. दररोज भांडण करीत आई-वडीलांना मारझोड करायचा. सोमवारी आई भेजगांव येथे आठवडी बाजार करून परत आल्यानंतर दारूच्या नशेत अंगणात झोपलेल्या चंद्रशेखरने आईसोबत भांडण करून मारझोडही केली. घर पेटवुन देण्याची धमकीही देत होता. दरम्यान वडील नागेंद्र वाढई आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखरला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांने वडीलांनाही मारहाण सुरू केली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर प्रहार करताच तो जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी नागेंद्र वाढई यांनीच पोलीस पाटील राजु कोसरे यांच्याशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.  पोलीस उपअधिक्षक तथा मूल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनखाली नागेंद्र वाढई यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे.