नागपूर : एका सुंदर दिसणाऱ्या रंगीत पालीचा शोध लावण्यात भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञांना यश आले आहे. काही पाली दिसायला साधारण पांढऱ्या किंवा काळपटच रंगाच्या दिसतात आणि सर्रास पाल म्हंटले की बहुतांश लोक पालीचा तिरस्कार करतात किंवा काहींना तिची किळसही वाटते आणि महिलाच काय, तर पुरुषही पालीला घाबरतात.

आपल्या मनात पालीविषयी एक भीती आणि घृणा निर्माण झाली आहे. वन्यजीव संशोधनादरम्यान तामिळनाडूमधील मधुराई जिल्ह्यातील एका भागामधून भारतीय वन्यजीव संशोधकांनी एक रंगीत पाल शोधून काढली आहे. त्यामुळे या पालीला पाहून नक्कीच ही घृणा दूर होईल.

हेही वाचा – चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघ जेरबंद; नागझिरा अभयारण्यात सोडणार!

ही पाल निम्यास्पिस कुळातील असून या पालीवर नारंगी, पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाची नक्षी आहे, अशा या विविध रंगांची उधळण या पालीच्या शरीरावर आसून याचे विशेष म्हणजे या पालीच्या पाठीवर पांढऱ्या रागाने एक जाळीदार अशी नक्षी बनलेली आहे आणि यामुळेच या पालीचे नाव ‘निम्यास्पिस रेटॅक्युलेटा’ असे ठेवण्यात आले आहे. आपल्या भारतातील वन्यजीव संशोधकांनी या पालीचा शोध लावला असून विशेष म्हणजे या संशोधनात इतर संशोधकाबरोबर दोन चिमुकले संशोधकही सहभागी झाले आहेत.

आयान सैय्यद आणि मासूम सैय्यद हे दोघे अनुक्रमे सहावी आणि सातवीत पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असून लहानपणापासूनच वन्यप्राण्यांची यांना आवड आहे. हे जगातील पहिले सर्वात लहान संशोधक आहेत ज्यांनी एका नवीन प्राण्याचा शोध लावण्यात आपला सहभाग नोंदवला आहे. हे संशोधन गेली काही वर्षे चालू होते ज्यामध्ये तामिळनाडू व केरळच्या विविध जंगलात जाऊन यांचा अभ्यास करण्यात आला.

हेही वाचा – भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी, नड्डा यांचा सहायक असल्याचे सांगणाऱ्याला बेडय़ा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पालीच्या अभ्यासात शारीरिक महत्तवाचे घटक तसेच या कुळातील सर्व पालीचा जनुकीय अभ्यासही करण्यात आला आहे. वन्यजीव संशोधक अमित सैय्यद यांची संशोधन पत्रिका इंडोनेशियातील ‘ट्याप्रोबोनिका’ नामक एका नामांकित शास्त्रीय नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाली आहे. या संशोधनात ‘डब्ल्यूएलपीआरएस’चे अमित सैय्यद, शौरी शुलाखे, जयदित्या, शुभकर देशपांडे, सॅमसन, अंनबाझगण, संतोष, आय्यान सैय्यद, मासूम सैय्यद तसेच ‘बीएनएचएस’चे राहुल खोत, आणि ओमकार आधिकरीही सहभागी होते.