बुलढाणा : होय! सांप्रदायिकता व कट्टरवादाने कळस गाठला अन किरकोळ कारणावरून विभिन्न धर्मियांत दंगली घडविल्या जातात. कधी हा धर्म तर कधी दुसरा धर्म ‘खतरेमे’ असल्याची आवई उठविली जाते. मात्र अजूनही भारत देशाची अखंडता व विविधतेत एकता कायम असून यासाठी अनेक समाजघटक निरपेक्षपणे कार्यरत आहे.

जिल्ह्यातील जयपूर (ता. मोताळा) हे गाव याचे मासलेवाईक व आदर्श उदाहरण ठरावे. मंदिर-मशीदवरून वर्षानुवर्षे राजकारण घडविले जात आहे. या दुर्देवी पार्श्वभूमीवर जयपूर या गावात ईश्वर व अल्लाह एकत्र नांदतो. हनुमान मंदिर व मशीद सख्खे शेजारी असल्यासारखे नांदतात. दहा दिवस लगतच गणपती बाप्पा विराजमान केल्या जातो. संध्याकाळची नमाज झाल्यावर गणराय व मंदिरातील आरती केली जाते. यामध्ये सर्वच धर्मीय अन् जाती जमातीचे ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात.

हेही वाचा – चिखलीतील शासकीय वसतिगृहातील ६ विद्यार्थिनींना विषबाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरू; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

हेही वाचा – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र; चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवच नव्हे तर सर्व सण उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. रमजानला शिरखुरम्याचा सर्वच गावकरी स्वाद घेतात तर दिवाळीच्या फराळ व अन्य सणांना होणाऱ्या गोड धोड पदार्थांची ‘भाईजान’ चव चाखतात. गावातील बुजुर्ग, माजी सरपंच विक्रम देशमुख, जामा मज्जिदचे इमाम हाफिज साजिद खान ही बाब साधेपणाने सांगतात. त्यात अहंकार वा अभिमानाचा लवलेशही नसतो. जातीयवाद, धार्मिक संघर्ष, कट्टरता हे शब्द जयपूरच्या सामाजिक शिकवणीत किंबहुना शब्दकोषातच नाहीये.