नागपूर : प्रियंका गांधी यांना लोकशाहीचा आदर नाही आणि त्यांनी तो कधीच केला नाही,अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या खासदार व अभिनेत्री कंगना रानौत यांनी केली.भारतीय जनता पार्टीचे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधाकर कोहळे आणि मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ पश्चिम व मध्य नागपुरात कंगना राणावत यांनी रोड-रोश शोकेला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेसने समाजा समाजामध्ये फूट पाडली.  आमच्या नेत्यांनी एकजुटीची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीने केवळ जातीचे आणि धर्माचे राजकारण केले आहे आम्ही सर्व जाती धर्माना एकत्र आणतो आहे तर काँग्रेसचे नेते तोडण्याची भाषा बोलत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकशाहीचा आदर नाही आणि तो त्यांनी कधीच केला नाही. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीवर विश्वास नाही,असे रानौत म्हणाल्या.

काँग्रेसने ६० वर्ष राज्य करुन देशाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले नाही ते मोदी सरकारच्या १० वर्षाच्या काळात घेण्यात आले आहे. देश प्रगती करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा सन्मान वाढला आहे आणि राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करीत आहे. लोकशाहीवर आणि न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही, त्यांच्याकडून जनता काय अपेक्षा ठेवणार . लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करुन त्यांना सत्ता मिळवता आली नाही. आता महाराष्ट्रातील जनता त्यांचा हिशोब करणार आहे.

हेही वाचा >>>रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाल तर शिवसेना बंद करावी लागेल असे वक्तव्य केले होते मात्र उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत जाऊन बसले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत न बोललेले बरे असेही त्या म्हणाल्या.नागपुरात मध्य व पश्चिम नागपुरात रोड शो आयोजित करण्यात आल्यानंतर जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरुन सरकारचे कौतुक केले. लाडली बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली असून त्याचा लाखो महिलांना लाभ मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान महायुतीला होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात आयोजित करण्यात आलेले दोन्ही मतदार संघातील रोड शो बघता शहरातील सर्व जागावर भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.