चप्राड टेकडीवरील दुर्गा माता मंदिर परिसरात घनदाट झुडपात रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात एक बिबट मुक्त संचार करीत असल्याचे दृश्य मंदिर परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहे.लाखांदूर तालुक्यातील चप्राड टेकडीवर घनदाट झाडीझुडपे आहेत. या झुडपात मागील काही महिन्यांपासून एका बिबट्यासह अन्य काही वन्यप्राण्यांचा वावर असल्याची चर्चा होती. दरम्यान काही महिन्यापूर्वी या परिसरात वावर असलेले एक अस्वल देखील रात्रीच्या सुमारास पहाडीवरील मंदिर परिसरात शिरकाव करून मुक्त संचार करताना आढळून आले होते.

हेही वाचा >>> गडचिरोली : खराब रस्त्याने घेतला आदिवासी गर्भवती महिलेचा बळी ; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी बिबट्याने दोन विविध घटनेत दोन पाळीव श्वानांची शिकार केल्याची माहिती मंदिरातील पुजाऱ्याने दिली. दरम्यान, नियमित रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास शिकारीच्या शोधात बिबट्यासह अन्य वन्य प्राणी पहाडीवरील मंदिर परिसरात संचार करताना आढळून येत आहे. आगामी नवरात्र उत्सवादरम्यान शेकडो भाविक चप्राड येथील दुर्गा मंदिरात गर्दी करतात. त्यामुळे भाविकांसाठी वन्यप्राण्यांचा असा संचार धोकादायक ठरू शकतो. यामुळे वनविभागाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.