पहाटेच्या सुमारास दबक्या पावलाने थेट घरात शिरलेल्या बिबट्याने साखरझोपेत असलेल्या व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मोहाडी तालुक्यातील केसलवाडा गावात घडली. इश्वरदास गजभिये हे घराच्या छपरात झोपले होते. अशातच, दबक्या पावलांनी बिबट घरात शिरला आणि त्याने गजभिये यांच्यावर हल्ला चढविला. घरातील सदस्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने तेथून पळ काढला.

हेही वाचा >>> नक्षलवाद्यांची ३० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंदची हाक; तोडगट्टा आंदोलकांच्या सुटकेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हल्ल्यात गजभिये जखमी झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, करडी येथे उपचार करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील केसलवाडा हे गाव नागझीरा व कोका अभयारण्यालगत असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा कायम वावर असतो. येथे वन्यप्राण्यांच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आज बिबट्याने चक्क घरात शिरून माणसाला लक्ष केल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.