लोकसत्ता टीम

नागपूर : जरीपटका ठाण्यांतर्गत २३ दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी लिव्ह इन पार्टनरने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
gujarat man went to drop wife to board vande bharat express ended up travelling with her Heres why
VIDEO : वंदे भारत ट्रेनमध्ये पत्नीला सोडायला गेला अन् अचानक बंद झाला दरवाजा; त्यानंतर घडले असे की,…

मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. गळा आवळून हत्या आणि मृत्यूपूर्वी झटापट झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.पोलीसी खाक्या दाखवताच प्रियकराने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. गंगाधर अर्जुन घरडे (४८) रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आणखी वाचा-वर्धा : शरद पवार काँग्रसचे माजी आमदार अमर काळेंना म्हणाले, ‘थोडे थांबा….’

गंगाधर पेंटिंगचे काम करतो. १ मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रेयसी नीतू (३४) हिची गळा आवळून हत्या केली. रात्रीतून तिचा मृतदेह घराच्या अंगणातील सीताफळाच्या झाडाला दोरी बांधून लटकवला. २ मार्चच्या सकाळी त्याने नीतूने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. नीतूच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. नीतूच्या शरीरावर काही जखमा होत्या. चौकशीत नीतूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. मात्र, भांडणामुळे २०१७ मध्ये ती पतीपासून वेगळी झाली. ती स्वत: काम करून उदरनिर्वाह चालवत होती. २०१९ मध्ये तिने गंगाधरशी लग्न करीत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर ती गंगाधरसोबत राहू लागली. काही दिवसानंतर नीतूने कुटुंबीयांना गंगाधर आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुलीही आहेत. तसेच तो दररोज दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा-चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण, दारुड्या युवकाने…

पोलिसांनाही घटनेबाबत संशय होता. उत्तरीय तपासणी अहवालातून नीतूचा मृत्यू गळफास लावल्याने नाहीतर गळा आवळण्यात आल्याने झाला आहे. तिच्या शरीरावरील जखमांवरून मरण्यापूर्वी तिला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला झाडाला लटकवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून गंगाधरला अटक केली आहे.