वर्धा : लोकांच्या प्रवासाचे आवडते साधन असलेल्या रेल्वेच्या डब्यांना आकर्षक रूप असल्यास पाहायलाच नको. तसेच अंतर्गत भाग म्हणजे शयनकक्ष सुसज्ज असेल तर मग मज्जाच. पण निवडक गाड्या तश्या सुसज्ज आहेत.
मध्य रेल्वे विभागातील सेवाग्राम, महाराष्ट्र एक्सप्रेस, नागपूर-पुणे, प्रेरणा एक्स्प्रेस व अन्य काही गाड्या जुन्या पद्धतीच्या डब्यानिशी धावत असल्याची बाब खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केली.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस
तडस यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. तसेच नवे आधुनिक पद्धतीचे एलएचबी कोच या गाड्यांना देण्याची मागणी केली. त्यावर रेल्वे मंत्र्यांनी असे कोच पुरविणे ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याचे नमूद केले. मध्य रेल्वेस ते देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच सकारात्मक घडामोड दिसणार असल्याचेही उत्तर रेल्वे मंत्र्यांकडून मिळाले. खासदार तडस यांनी सांगितले की सर्वच गाड्यांमध्ये हा बदल अपेक्षित आहे.