नागपूर : नववीत शिकणाऱ्या स्विटी (काल्पनिक नाव) आणि स्वतंत्र मिश्रा या दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. बारावी उत्तीर्ण होताच दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांना कुणकुण लागताच दोघांचीही ताटातूट झाली. स्वतंत्रने नागपुरात येऊन स्विटीला पळवून नेले. पोलीस तक्रार झाली आणि तीन वर्षानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने दोघांनाही बाळासह ताब्यात घेतले. ‘माझे प्रेम…माझे बाळ..माझा पती,’ अशी भूमिका स्विटीने घेत वडिलांच्या घरी जाण्यास नकार दिला.  शेवटी दोन्ही कुटुंबीयांनी तोडगा काढला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे नागपुरातून पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाच्या प्रेमकथेचा शेवट गोड झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्विटीच्या वडिलांचे झारखंडमधील जमशेदपूरला मोठे स्पेअर्स पार्टचे दुकाने होते. त्यांना स्विटी ही एकुलती मुलगी आहे. नववीत शिकत असताना स्वतंत्र आशूतोष मिश्रा (जमशेदपूर) याच्याशी ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांही बारावीपर्यंत एकाच कॉलेजला प्रवेश घेतला.  निकाल आल्यानंतर प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. बारावीची परीक्षा संपल्यानंतर स्वतंत्र आणि स्विटीच्या प्रेमाबाबत तिच्या वडिलांना कुणकुण लागली. तिची समजूत घातली. परंतु, ती मानायला तयार नव्हती. शेवटी वडिलांनी झारखंड सोडले आणि नागपुरात व्यवसाय थाटला.

हेही वाचा >>> नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचे आव्हान स्वीकारले पण…

मात्र, प्रेयसीसाठी वेडा झालेला स्वतंत्र नागपुरात आला व जुलै २०२० मध्ये स्विटीला  पळवून नेले. तिच्या वडिलांनी स्वतंत्रविरुद्ध अजनी ठाण्यात तक्रार दिली. अजनी पोलिसांना तीन वर्षांपर्यंत स्विटीचा शोध लागला नाही. शेवटी एएचटीयू पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी प्रकरण हाताळले. त्यांनी जमशेदपूररला जाऊन सापळा रचला. स्विटीला १ वर्षाच्या बाळासह ताब्यात घेतले. तंत्र  सापडला नाही. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एपीआय रेखा संकपाळ, हवालदार राजेंद्र अटकाळे, सुनील वाकळे, आरती चौव्हाण, शरीफ शेख, ज्ञानेश्वर ढोके, पल्लवी वंजारी यांनी केली.

हेही वाचा >>> VIDEO: रानकुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या सांबराची आयुष्याशी  लढाई

 स्विटी आणि स्वतंत्र यांना एक बाळ आहे. पोलिसांनी स्विटीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेला स्वतंत्र धावत-पळत जमशेदपूरला आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रियकर-प्रेयसीला पोलिसांनी नागपुरात आणले. दोघांच्याही कुटुंबीयांना पोलिसांकडून कायदेशिर प्रक्रिया समजून सांगण्यात आली. शेवटी दोघांच्याही कुटुंबीयांनी यावर तोडगा काढून लग्नाबाबत सकारात्मकता दाखवली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love story nagpur couple love marriage decision family members adk 83 ysh
First published on: 21-01-2023 at 16:57 IST