लोकसत्ता टीम

नागपूर : मोसमी पावसाने काढता पाय घेतला असला तरीही अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर उर्वरित राज्यात काही दिवसपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वरार्धात थंडी कमी जाणवणार आहे.

आणखी वाचा-वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली. तसेच केरळ व तामीळनाडू राज्यात देखील पाऊस वाढला आहे. सध्या केरळ किनारपट्टीपासून तर दक्षिणपूर्व अरबी समुद्रात खालच्या व मध्यम भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पश्चिम वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.